तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर नगरपालिकेत कंत्राटी अभियंता प्रशांत चव्हाण यांची नियुक्ती नियमबाह्य पद्धतीने करण्यात आली आहे. गेल्या 15 वर्षांपासून ते कंत्राटी पद्धतीवर काम करत असून, त्यांना नियम धुडकावून वेतन दिले जात असल्याचे स्पष्ट करुन, या प्रकरणाची चौकशी करून कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही जिल्हाध्यक्ष किरण कांबळे यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देवुन दिला आहे. तुळजापूर विकास प्राधिकरण नंतर आता श्रीक्षेञ तुळजापुर विकास आराखडा अशा कंञाटी अभियंत्याचा अधिपत्या खाली राबवला जात असेल तर  दर्जा  काय असेल  असा प्रश्न शहरवासियांन मधुन केला जात आहे.

गेल्या 15 वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर काम करणारे अभियंता प्रशांत चव्हाण यांची सेवा नियमबाह्य पद्धतीने कायम ठेवण्यात येत असल्याचा आरोप निवेदनात  केला आहे. तुळजापूर नगरपरीषद  विभागातील  महत्वाचा असा बांधकाम विभाग आहे .यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची सखोल चौकशीची ही मागणी  आता होवु लागली आहे   यापुर्वी येथील ऐका कंञाटी अभियंत्याची विकेट पडली अभियंता चव्हाण यांचे काय होणार वरदहस्त मुळे जागेवर राहणार की विकेट पडणार ,याची उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रशांत चव्हाण यांना केवळ कंत्राटी अभियंता म्हणून नियुक्ती देण्यात आली होती.मात्र त्यांना नियम घालून कायम ठेवले गेले तसेच वेतनही नियमबाह्य पद्धतीने देण्यात आले. तुळजापूर विकास प्राधिकरणातील या प्रकरणामुळे नगरवर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

 
Top