धाराशिव (प्रतिनिधी)- येथील मौलाना शौकत सय्यद यांनी आज काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वासराव शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी जनता बँकेचे संचालक आशिष मोदानी, जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील सर, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सरचिटणीस जावेद काझी, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, सौरभ गायकवाड उपस्थित होते. मौलाना शौकत सय्यद हे जमीयात उलेमा हिंद चे महाराष्ट्र कार्यकारी मंडळ सदस्य तसेच पत्रकार आहेत. विविध सामाजिक उपक्रमात ते सक्रिय आहेत.