धाराशिव (प्रतिनिधी)- उस्मानाबाद जिल्हा स्वातंत्र्यसैनिक समिती संचलित धाराशिव प्रशाला, धाराशिव यांनी जिल्हास्तरीय कला उत्सव स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या जिल्हास्तरीय कला उत्सव स्पर्धेत धाराशिव प्रशालेने सादर केलेल्या “सावित्री तू शिक” या नाटकाला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला. जिल्ह्यातील तब्बल 32 शाळांनी सहभाग नोंदवला असताना धाराशिव प्रशालेने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची दाद मिळवली.

या नाटकात वैष्णवी मोरे, साक्षी लोहार, जोया बोहरी, दूर्वा पेठे, संबोधी गायकवाड, आराध्या नाकिळक व सनात तांबोळी या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट सादरीकरण केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मलखरे, सचिव दिलीप गणेश, उपाध्यक्ष अण्णासाहेब जाधव, कोषाध्यक्ष उमाजी देशमुख, सहसचिव ॲड. सुग्रीव नेरे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक पंडित जाधव, मार्गदर्शक शिक्षिका दिपाली रोकडे व गौरी माने तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.  या यशामागे शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यामुळेच विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.

 
Top