धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात अकरावी वर्गातील विद्यार्थ्यांचे स्वागत अनोख्या पद्धतीने महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून विद्यार्थ्यांना वाजत गाजत आणि त्यांच्यावर बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून पुष्पवृष्टी करून व शिक्षकांकडून पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संदीप देशमुख म्हणाले की, महाविद्यालयात जवळपास 80 टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली असून, नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत उत्साहात आणि आनंदी वातावरणामध्ये सकारात्मक पद्धतीने होण्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम कनिष्ठ विभागाकडून राबविण्यात आलेला आहे. हा उपक्रम कौतुकास्पद आहे असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा.बबन सूर्यवंशी, कनिष्ठ विभागाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा.सचिन चव्हाण, आदीसह कनिष्ठ विभागातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते त्याचबरोबर वरिष्ठ विभागातील प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. डॉ. मारुती लोंढे, स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ.बालाजी गुंड आदीसह वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी अकरावी विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतील जवळपास 500 विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
