धाराशिव (प्रतिनिधी)- कष्ट आणि जिद्द असेल तर स्पर्धा परिक्षेत यश मिळते असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक दराडे यांनी केले. दरवर्षीप्रमाणेच यंदाही “ तेरणाचा राजा “ गणपतीची थाटात स्थापना करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांच्या हस्ते विधिवत स्थापना करून पूजा करण्यात आली. 

गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शहर पोलीस स्टेशनचे पी.आय. दराडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दराडे म्हणाले की, पदवी शिक्षण क्रमातच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकडे आपले लक्ष केंद्रित केले तर एमपीएससी, यूपीएससी सारख्या स्पर्धात्मक परीक्षा सहज साध्य होऊ शकतात. अभियांत्रिकीचे विद्यार्थी मुळातच हुशार असल्याने कष्ट आणि जिद्द असेल तर ते सहज अशा परीक्षेला सामोरे जाऊ शकतात. यामुळे आपण चार वर्षे चांगल्या पद्धतीने अभियांत्रिकीचे शिक्षण घ्या व आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करा असा संदेश पोलीस इन्स्पेक्टर दराडे यांनी दिला. 

 यावेळी बोलताना अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉकल. विक्रमसिंह माने म्हणाले की या गणेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध तज्ज्ञांच्या  व्याख्यानाचे आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन होते.  तेरणेच्या राजाच्या स्थापनेच्या वेळी विभाग प्रमुख डॉ. डी डी दाते,  डॉ. उषा वडणे, प्रा. शीतल पवार, प्रा. डी एच निंबाळकर, डॉ. राजश्री यादव, प्रा.वर्षा पाटील, प्रा.आरती शिंदे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोज होणाऱ्या आरतीचा आणि व्याख्यानाचा विद्यार्थ्यांनी आणि सर्वांनी लाभ घ्यावा असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले.

 
Top