तुळजापूर (प्रतिनिधी)- प्रवीण नरहरी कदम व यजमान नानासाहेब टोले यांच्या हस्ते रणसम्राट कबड्डी मंडळ श्री गणेश मूर्तीची आरती करण्यात आली.
तुळजापूर शहरातील महाध्दार परिसरात असणाऱ्या रणसम्राट कबड्डी संघ गणेश मंडळाचा श्रीगणेशाची पुजा शिवभवानी प्रतिष्ठान अध्यक्ष प्रविण कदम तसेच नानासाहेब टोले व पञकार बांधव यांच्या शुभहस्ते करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी ‘ झाडे लावा, झाडे जगवा' हा संदेश देण्यासाठी पञकारांचा वृक्ष देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच गणेशभक्त उपस्थित होते.