भूम (प्रतिनिधी)- भूम शहरातील साळीवाडा येथील श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या स्लॅबचे उदघाटन माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी संजय गाढवे यांनी या कामासाठी 51 हजार रुपये देणगी दिली.
या कर्यक्रमांस हभप. सोमनाथ बाबर महाराज यांनी सांगितले की, ही विठ्ठल रुक्माई ची मूर्ती काळातली आहे. जेव्हा या मंदिराचे खोदकाम केले तेव्हा विठ्ठल रुक्माई ची मूर्ती या खोदकाम करताना निघाली व तसेच या मूर्तीला आघात देखील झाला असून त्या मूर्तीच्या अंगावर निशाणी देखील आहे. हे मंदिर खूप जुने आहे. सागर टकले, पत्रकार तानाजी सुपेकर,अशिष बाबर, योगेश आसलकर महाराज, शाम बागडे, अतुल उपरे, युवा उद्योजक सुरज गाढवे, वस्ताद मामू जमादार, गोकुळ जिकरे, अविनाश बाराते, राम बाबर, दादासाहेब गाढवे, प्रदीप चौधरी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
