परंडा (प्रतिनिधी)- बुधवार दिनांक 20/8 /2025 रोजी परंडा येथील शासकीय विश्राम गृह येथे डी.बी.ए समूहाच्या वतीने 625 वी संत सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डी.बी.ए.समूह चे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे,नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाअध्यक्ष राहुल बनसोडे, नाभिक संघटनेचे अध्यक्ष कालिदास काशीद, कीर्तनकार बालाजी महाराज बोराडे, महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष बिभीषण खुणे,माजी पंचायत समिती सदस्य दीपक गायकवाड, ॲडवोकेट दयानंद धेंडे, यांनी सामुदायिक संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे दीप धूप प्रज्वलन करून अभिवादन केले.
यावेळी नायब तहसिलदार पांडुरंग माढेकर, हभप बालाजी महाराज बोराडे यांनी संत सेना महाराज यांच्यावर जिवनावरीलआपले विचार मांडले. यावेळी जय हनुमान ट्रेलर अंकुश जमदाडे, धर्मराज नरोटे, प्रीतम ओव्हाळ, हरिभाऊ गोडगे, छगन चौधरी, रवींद्र शिंदे,नागराज आहिरे ,दत्तात्रय आहिरे ,श्रीकांत वाघमोडे, सचिन भालेकर, संतोष डाके, रामचंद्र काशीद,सुरज काळे, बाबा दनाने ,गणेश जमदाडे आदी नागरिक व नाभिक समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.शेवटी उपस्थितांचे आभार प्रदर्शन दयानंद बनसोडे यांनी मानले.
