परंडा (प्रतिनिधी)- भाजपा नेते मा.आ.सुजितसिंह ठाकूर यांनी भाजपा ग्रामीण मंडळाध्यक्ष तथा परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि वाकडी ग्राम पंचायत सदस्य अरविंद रगडे यांचा बुधवार दि.20 रोजी वाढदिवसानिमित्त संपर्क कार्यालय परंडा येथे सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा शहर मंडळाध्यक्ष उमाकांत गोरे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, सुखदेव टोंपे, ॲड.जहीर चौधरी, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, सरपंच तुकाराम हजारे, बिभीषण हांगे, जगताप सर, निशीकांत क्षिरसागर, सारंग घोगरे, अजित काकडे, साहेबराव पाडुळे, किरण देशमुख, सुजित परदेशी, रामदास गुडे, नागेश शिंदे, किरण कवटे,नागेश गर्जे, अरुण करळे, जयंत सायकर, सिध्दीक हन्नुरे तसेच मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
