भूम (प्रतिनिधी)- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाची गतीने घटनात्मक बांधली चालू असून त्याचाच एक भाग म्हणून तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत . यात जम्बो कार्यकारणी करून नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे .
मंगळवार दिनांक 15 जुलै 2025 रोजी भारतीय जनता पार्टीच्या आदेशानुसार तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील तालुका कार्यकारिणी ज्येष्ठ नेते माजी आ. सुजितसिंह ठाकुर, माजी मंत्री आ. राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, परंडा विधानसभा निवडणूक प्रमुख बाळासाहेब क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर यांनी जाहीर केली आहे .
नवीन कार्यकारणीत सरचिटणीस 2, तालुका उपाध्यक्ष 6, चिटणीस 7, कोषाध्यक्ष 1, सदस्य - 40, कायम निमंत्रीत 15 तर 26 विविध आघाडीचे अध्यक्ष केले आहेत.
तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर यांनी जाहीर केलेल्या नूतन कार्यकारणीमध्ये सरचिटणीस . बिभीषण पवार रघुनाथ वाघमोडे, उपाध्यक्ष अच्युत गटकळ, मारुती चोबे, हेमंत देशमुख, समाधान अंधारे , शितल कांबळे, भाग्यश्री क्षीरसागर , लक्ष्मण मोरे , कोषाध्यक्ष जनार्दन नागरगोजे, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अतुल अंधारे, उपाध्यक्ष संदीप महानवर , अंकुश तिवारी, धनाजी सोनवणे , रमेश कुठे, सरचिटणीस दत्तात्रय गोरे, अमित पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष स्वाती तनपुरे, किसान मोर्चा अध्यक्ष विकास जालन, उपाध्यक्ष औदुंबर गोलेकर, कामगार मोर्चा अध्यक्ष संदीप खराडे, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष अब्दुल लहाजी, ओबीसी मोर्चा अध्यक्ष सुहास सातप, अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष दिनकर कांबळे , उद्योग आघाडी तालुका अध्यक्ष रमेश बगाडे, तालुका प्रसिद्धी प्रमुख शंकर विठ्ठल खामकर, भटके विमुक्त अध्यक्ष शिवाजी उगलमुगले, पंचायतराज व ग्रामविकास आघाडी अध्यक्ष सुबराव शिंदे, सहकार आघाडी अध्यक्ष बाबासाहेब गीते , माजी सैनिक आघाडी अध्यक्ष शिवाजी चव्हाण, बेटी बचाव बेटी पढाव अध्यक्ष मंदाकिनी मासाळ, विधी आघाडी अध्यक्ष विधीज्ञ अंगद चव्हाण, दिव्यांग आघाडी अध्यक्ष विलास घुले, मीडिया सेल अध्यक्ष सुजित वेदपाठक, आध्यात्मिक समन्वयक प्रकोष्ठ तानाजी खामकर, व्यापारी आघाडी अध्यक्ष बालाजी बांगर अशी निवड केली आहे.
याशिवाय कायम निमंत्रितांमध्ये महादेव वडेकर, सुदाम पाटील, जालिंदर मोहिते, काकासाहेब चव्हाण, चंद्रकांत मासाळ , बाबुराव खरात, दिलीप सानप, भगवान नाईकनवरे, अंगद मुरुमकर, आदम शेख, लताबाई गोरे, राजसिंह पांडे, भाऊसाहेब कुठे यांचा समावेश आहे.