भूम (प्रतिनिधी)- संपूर्ण देशवासियांचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले वैभव असलेले 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. ‌‘अद्वितीय वैश्विक मूल्य' म्हणून त्याचा आता समावेश करण्यात आला आहे. या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचा आनंद भाजप कार्यालयात शनिवार दि 12 जुलै 2025 रोजी प्रतिमा पूजन करून अभिवादन केले . 

वारसा यादित समाविष्ठ झालेल्यामध्ये महाराष्ट्रातील 11 किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी व तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. स्वराज्यनिर्मिती आणि ते टिकविण्यासाठी महाराजांनी हे किल्ले वैभव उभारले. शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य हे मराठा स्थापत्य शास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. हे माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यात दिसून येत नाही. माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्ध कौशल्याचा मुत्सद्दीनीतीने रचलेला भाग आहे. हेच ‌‘अद्वितीय वैश्विक मूल्य' आहे.

यावेळी भारतीय जनता पार्टी परांडा विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर, तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर, तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख, अ.जा. मोर्चा तालुकाध्यक्ष प्रदीप साठे, शहराध्यक्ष बाबासाहेब वीर, तालुका प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, तालुका अध्यात्मिक सेवा अध्यक्ष बन्सी महाराज काळे व सहकारी उपस्थित होते.

 
Top