धाराशिव (प्रतिनिधी) - दुर्बलांना मदत करतो आणि सबळांची मदत घेतो तो सहकार. या सहकार क्षेत्राला 125 वर्ष पूर्ण होत आहेत. निर्मिती नागरी सहकारी पतसंस्था ही येणाऱ्या काळात धाराशिव जिल्ह्यात सहकारी क्षेत्रात नाव लौकीक करेल अशी अपेक्षा न्यू सातारा ग्रुप ऑफ को -ऑपरेटीव्हचे संचालक राजाराम निकम यांनी व्यक्त केली. शहरातील श्री. अनंतदास महाराज स्मारक मंदिराजवळील निर्मिती नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते काल सोमवार, 14 जुलै रोजी करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्थभक्त मोहनबुवा रामदासी तर प्रमुख अतिथी म्हणून न्यू सातारा ग्रुप ऑफ को -ऑपरेटीव्हचे संचालक राजाराम निकम, जेष्ठ विधीज्ञ ॲड. मिलींद पाटील, वकील नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा जेष्ठ विधीज्ञ ॲड. राजेंद्र धाराशिवकर, जनता सहकारी बँकचे संचालक आशिष मोदानी, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलानाने करण्यात आली. यावेळी बोलताना सर्व मान्यवरांनी संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा देवून संस्थेच्या कार्याविषयी अनमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव गजानन नारीकर यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी संस्था स्थापनेमागील माहिती दिली. सुत्रसंचालन संचालक गजानन घुगीकर तर आभार संचालक निलेश कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमासाठी शहरातील व्यावसायीक, मित्रमंडळी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top