उमरगा (प्रतिनिधी)- मुलीच्या कॉलेजमधील परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी बाहेर गेलेल्या महिलेचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 1 लाख 70 हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना उमरगा शहरातील समता नगर भागात घडली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी उषा बुध्दार्थ झाकडे (वय 49, रा. समता नगर) या दि. 24 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 ते 3 वाजण्याच्या सुमारास आपल्या मुलीचा सी.ई.टी. परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी घराजवळील श्रमजिवी कॉलेजमध्ये गेल्या होत्या. त्यांनी आपल्या घराला कुलूप लावले होते. त्या घरी नसताना हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले एकूण 1 लाख 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. घरी परतल्यावर चोरीचा हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. या घटनेप्रकरणी उषा झाकडे यांनी दि. 13 जुलै 2025 रोजी उमरगा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 331 (4) आणि 305 (ए) अन्वये घरफोडीचा गुन्हा नोंदवला असून, आरोपीचा शोध सुरू केला आहे.


 
Top