भूम (प्रतिनिधी)- राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्ताने तालुका भाजपच्यावतीने महारक्तदान शिबीर घेण्यात आले . या शिबिरामध्ये ११३ दात्याने रक्तदान केले .
मंगळवार दिनांक 22 जुलै 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुका भाजपच्यावतीने शहरातील नागोबा मंदिर या ठिकाणी माजी आ. सुजितसिंह ठाकूर, माजी मंत्री आ. राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक अध्यक्ष तथा भाजपचे राज्य परिषद सदस्य बाळासाहेब क्षिरसागर यांच्या नेतृत्वात तालुका भाजपच्यावतीने महारक्तदान घेण्यात आले. वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कसल्याही प्रकारचा अवास्तव खर्च करू नये, वायफळ खर्च करू नये, विधायक काम करावे, वृक्ष लागवड, अन्नदान, आरोग्य शिबीर, स्वच्छता मोहिम, रक्तदान शिबीर यासारखे कार्यक्रम घ्यावे अशा प्रकारच्या सूचना करण्यात आलेली आहे त्याच अनुषंगाने तालुका भाजपच्यावतीने महारक्तदान शिबीर घेतले. या शिबिरामध्ये दिवसभरात ११३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबीरासाठी तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर, निमंत्रित सदस्य सुदाम पाटील, महादेव वडेकर, शहराध्यक्ष बाबासाहेब वीर, तालुका प्रसिद्ध प्रमुख शंकर खामकर , सरचिटणीस रघुनाथ वाघमोडे, उपाध्यक्ष मारुती चोबे, चिटणीस संतोष अवताडे, शरद चोरमले, आकाश शेटे, शांतीराज बोराडे, सिद्धार्थ जाधव, बन्सी काळे, आबासाहेब मस्कर, रुषी खोले, शुभम खामकर, बाजार समिती संचालक विकास जालन, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष लताताई गोरे, विधिज्ञ संजय शाळू, चंद्रकांत गवळी, लक्ष्मण भोरे, जेष्ठ नेते भीमराव करडे, संदीप महानवर, कोषाध्यक्ष जनार्दन नागरगोजे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष सुहास सानप, पंचायत राज ग्रामविकास आघाडी अध्यक्ष सुबराव शिंदे आदींनी परिश्रम घेतले.