तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवार दि. 22 जुलै रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात महाआरती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात येवुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातून महाराष्ट्राची अशीच सेवा घडो, त्यांना उत्तम आरोग्य लाभो, अशी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. यावेळी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.