भूम (प्रतिनिधी)- सोलापूर येथील ड्रीम फाऊंडेशन यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे देण्यात येणारा "डॉ. कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार" या वर्षी ‘नोकरी मार्गदर्शन केंद्र’ चे संस्थापक संचालक मा. महारुद्र माडेकर यांना जाहीर झाला आहे. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए पी.जे. अब्दुल कलाम यांच्या १० व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना देऊन गौरविण्यात येणार आहे.
सदरील पुरस्कारासाठी निवड समितीने मा. महारुद्र माडेकर यांचे नाव त्यांनी बेरोजगारांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जाहीर केले असून रविवार दिनांक २७ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता ‘द्वारकाधीश मंदिर सभागृह, जय जलाराम नगर, मंत्री चंडक जवळ, विजयपूर रोड, सोलापूर’ येथे ज्येष्ठ वैज्ञानिक व डॉ. कलाम सरांसोबत काम केलेले मा. श्री. डॉ. अशोक नगरकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण समारंभ होणार असून सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल, मानाचा फेटा, डॉ. कलाम यांचे ग्रंथ व रोप देऊन गौरविण्यात येणार आहे.