तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी भक्तांना लवकरच मंदीर संस्थान वतीने लाडुप्रसाद वाटप केला जाणार असल्याची माहीती श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किर्ती किरण एच पुजार यांनी दिली.
श्रीतुळजाभवानी भक्तांना प्रसाद म्हणून लाडू प्रसाद देण्याचा संकल्प मानस होता. या पार्श्वभूमीवर निविदा पध्दत पारदर्शक पध्दतीने राबवली गेली. सुप्रसिद्ध चितळे मिठाई वाले यांना लाडू प्रसाद टेंडर मिळाले आहे. श्रीतुळजाभवानी भक्तांना लाडू प्रसाद वाटप बाबतीत मुहुर्त काढण्यासाठी चार ते पाच तारखा फायनल केल्या आहेत. रोज किती लाडू प्रसाद वाटायाचा, देणगीदाराने दिल्यास किती वाटायाचा, या बाबतीत अंतीम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.