भूम (प्रतिनिधी)- शिक्षणासाठी एसटीचा प्रवास करून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पास साठी एसटीच्या आगारात जावे लागत असे मात्र परिवहनमंत्री तथा पालकमंत्री धाराशिव प्रतापजी सरनाईक यांनी दिलेल्या निर्देशानुसार आता मुलांचा वेळ व त्रास वाचण्यासाठी त्यांना शाळेतच एसटीचे पास वितरण केले जात आहे धाराशिव जिल्ह्यातील भूम मधील जिल्हा परिषद हायस्कूल भूम या ठिकाणी सुमारे दीडशे होऊन अधिक विद्यार्थ्यांना गेल्या पंधरा दिवसात या योजनेचा लाभ मिळवून घेतला असून त्यांना शाळेतच पास मिळाल्याचे त्यांनी फरफट व त्रास वाचला आहे.
ग्रामीण भागातील मुला मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून साक्षर बनवण्यासाठी हा उपक्रम शासनाने सुरू केला आहे याला अधिक गती मिळावी म्हणून आम्ही उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे, परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक, आमदार प्रा डॉ तानाजी सावंत, शिवसेना सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते यांचा मार्गदर्शनाखाली ज्या शाळेतून मोफत बाबत मागणी होत आहे अशा शाळांमध्ये जाऊन पास वाटप करून अधिक माहिती भूम आगारप्रमुख उल्हास शिनगारे यांना देत आहोत.एसटीमध्ये सतत प्रवासी असल्याने मुलींचा प्रवासी सुरक्षित होत आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजनेमुळे शाळेमध्ये मुलींच्या उपस्थितीत वाढत चाललेली आहे यामुळे ही उपस्थिती अशीच वाढत राहण्यासाठी भूम आगार प्रमुखांनी शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटीची व्यवस्था वेळेत व्यवस्था करावी तरच या योजनेला अधिक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल. असे मत शिवसेना वैद्यकीय जिल्हाप्रमुख पांडुरंग धस यांनी व्यक्त केले.
यावेळी शिवसेना शाखाप्रमुख श्रीहरी दवंडे, मुख्याध्यापक श्री कांबळे, टी.बीश्री.पायघण यु.पी,श्री.पवार के.सी,श्री.पाटीलडी.जी,श्री.गुंजाळ डी.एस,श्री.जोशी ए.टी, श्रीमती.विधाते व्ही.आर,श्रीमती.तांबारे पी.ए,श्री.साठे एच.डी,श्री.शिंदे सर.श्री.पवार नितीन सर, श्री.झरकर ए.के, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.