तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा अंतर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम निमीत्ताने विद्यार्थी यांना समुपदेशन करण्यात आले.
यावेळी आरोग्य विभागाचे वैद्यकीय पर्यवेक्षक यु. आर.शिंदे, कुष्ठरोग तंत्रज्ञ एम. एस.नागलबोणे, आरोग्य सेवक एस. एन.खुणे, वैभव सावंत, पॅरामेडिकल सहाय्यक दीपक नागलबोने, आशा स्वयंसेविका सुषमा सरवदे, राणी शिराळ, झिंजे पुष्पा, कविता आंधळे रेश्मा नान्नजकर आदी उपस्थित होते. यावेळी वैद्यकीय पर्यवेक्षक यु. आर. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक जे. के.बेदरे, पर्यवेक्षक एस. एस. बळवंतराव, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. यु. गोडगे यांनी केले.