तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील कन्या प्रशाला तुळजापूर या शाळेमध्ये अपशिंगा केंद्राची या शैक्षणिक वर्षातील पहिली शिक्षण परिषद व अपशिंगा केंद्राचे माजी केंद्रप्रमुख श्री राजश्री कट्टे यांचा सेवापुर्ती गौरव पुरस्कार व कृतज्ञता सोहळा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.

 सदरील कार्यक्रमाचे आयोजन अपशिंगा केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी केले होते. स्तकारात कट्टे साहेब यांना तुळजाभवानी ची सिंहासनावर बसलेली मूर्ती व भर पेहराव करण्यात आला. सदरील कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तुळजापूर तालुक्याचे नवनिर्वाचित गटविकास अधिकारी भिंगारदिवे(वर्ग 1) तर प्रमुख पाहुणे म्हणून तुळजापूर तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी माननीय श्री अर्जुन जाधव साहेब,केंद्राचा नवीन पदभार घेतलेले केंद्र प्रमुख श्री मोहन भोसले केंद्रीय मुख्याध्यापक श्री गणपत पाटील  हे होते. व मंचावर श्री कट्टे साहेब यांच्या सुविधे पत्नी व त्यांचा मुलगा तसेच शिक्षक नेते श्री बशीर तांबोळी,श्री डीडी हुंडेकरी, श्री शिवाजी साखरे,श्री सचिन राऊत व पवन सूर्यवंशी ये सर्व उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पवन सूर्यवंशी यांनी करत असताना सदरील कार्यक्रमाचे आयोजन कशाप्रकारे केले हे सांगितले व या कार्यक्रमाची नेमकी गरज व उद्देश काय याचाही मागोवा श्री पवन सूर्यवंशी यांनी घेतला त्यानंतर  गटविकास अधिकारी श्री भिंगारदिवे साहेब यांनी कट्टे साहेबांना शुभेच्छा देऊन शिक्षकांनी नेमकं कोणत्या प्रकारचे कार्य करायला पाहिजे व शिक्षक जे काम करतात त्या कामामुळे त्यांच्या शाळेची तसेच त्यांची व पर्यायाने आपल्या तालुक्याची मान संपूर्ण जिल्ह्यामध्येच नाही तर राज्यामध्ये उंचावली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी सर्व शिक्षकाकडून व्यक्त केली.

 गटशिक्षणाधिकारी श्री अर्जुन जाधव यांनी निपुण भारत याचा आढावा घेत आपले विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहेत हे आपल्या वर्गासमोर तो तक्ता लावून तो आपण रोज पाहून त्यानुसार शिक्षकाने कृती करावी अशी सांगितले व त्यांनीही श्री कट्टे साहेबांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अनेक मान्यवरांची भाषणे झाली.

या सर्व सत्काराच्या उत्तर म्हणून  श्री कट्टे साहेब यांनी सांगितलं की त्यांना अपसिंगा केंद्रातून खूप असं प्रेम व सहकार्य लाभले, सर्व शिक्षक संघटना व सर्व शिक्षकांचे खूप मोलाचे सहकारी लाभले. त्यामुळे त्यांची नोकरी अतिशय उत्साहात पार पडली याचा त्यांना खूप खूप अभिमान वाटतो. जाता जाता त्यांनी एक गोष्ट सांगितली की सर्व शिक्षकांनी आपापल्या स्टाफ मध्ये चांगल्या प्रकारची एकी ठेवली तर कोणत्याही प्रकारचे आपल्याला अडचणी येत नाही असे त्यांनी सांगितले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खडकीकर व सचिन राऊत यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार श्री डीडी हुंडेकरी यांनी मांडले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांसाठी उत्तम अशा स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था श्री कट्टे साहेब यांच्या वतीने केली होती भोजनानंतर सदरील कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 
Top