धाराशिव (प्रतिनिधी)- जागतिक युवक कौशल्य दिनाच्या निमित्ताने धाराशिव जिल्ह्यातील युवकांसाठी अनेक आशादायक संधी निर्माण होत असून, शासनाच्या रोजगार व कौशल्य विकास योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केले.

महायुती सरकारने घेतलेल्या रोजगाराभिमुख निर्णयांमुळे जिल्ह्यातील हजारो युवकांसाठी नोकरी व उद्योजकतेची दारे उघडली गेली आहेत. विशेषतः  संस्था, कौशल्य विकास केंद्रे, व सहकार प्रकल्पांच्या माध्यमातून प्रशिक्षण घेत असलेल्या युवकांना स्वतःचे उद्यम सुरू करण्यास मदत होत आहे. असे कुलकर्णी प्रसिद्धीपत्रका द्वारे सांगितले. युवकांनी केवळ शासकीय नोकरीकडे पाहू नये, तर स्वतःचा व्यवसाय, स्टार्टअप्स याकडे वळावे. जिल्ह्यातील कृषी प्रक्रिया उद्योग, महिला उद्योजकांसाठीच्या योजना, मुद्रा व स्टँड अप योजनेच्या माध्यमातून अनेक तरुणांनी स्वतःचा व्यवसाय यशस्वीरीत्या उभा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रोजगार व कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली रोजगार निर्मितीसाठी अनेक प्रभावी योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा लाभ ग्रामीण भागातील युवकांपर्यंत पोहोचवण्यात धाराशिव आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून विविध प्रशिक्षण केंद्रे आणि उद्योगविकास प्रकल्प धाराशिव जिल्ह्यात आणले आहेत.


 
Top