धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून मालाविषयक गुन्हे उघड करण्यासाठी व फरार आरोपी पकडण्यासाठी पेट्रोलींग करीत असताना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी बेंबळी पॉईट येथे एका लहान बालकासह एकास केबल वायर सह पकडले आहे.
पोलिस सुत्रांने दिलेल्या माहितीनुसार, दोन इसम चोरीचे केबल, वायर जाळून आणुन त्याचे तांब्याची तार विकणार होते. पथकाने विशाल शाम जाधव, वय 20 वर्षे, व विधीसंघर्ष बालक दोघे रा. साठेनगर धाराशिव ता. जि. धाराशिव अशा दोघांना मुद्देमालासह पकडले. सदरची केबल वायर ही पोलीस ठाणे तुळजापूर, पोलीस ठाणे नळदुर्ग व पोलीस ठाणे तामलवाडी हद्दीतुन चोरी केली असल्याची सांगीतले. विशाल शाम जाधव, वय 20 वर्षे, व विधीसंघर्ष बालक दोघे रा. साठेनगर ता. जि. धाराशिव यांचे ताब्यातुन नमुद गुन्ह्यातील केबल वायर व मोटरसायकल असे एकुण 71 हजार 660 रूपये किंमतीचा माल जप्त करुन पुढील कार्यवाही कामी गुन्ह्यातील मुद्देमालासह आरोपीस तुळजापूर पोलीसांच्या ताब्यात दिले.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना. यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोलीस हावलदार दयानंद गादेकर, बळीराम शिंदे, पोलीस नाईक अशोक ढगारे, पोलीस अंमलदार योगेश कोळी, चालक पोह विजय घुगे यांच्या पथकाने केली आहे.