तेर (प्रतिनिधी)- प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत भिकार सारोळा येथील लाभार्थ्यांना तेर येथे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते टूलकिटचे वाटप करण्यात आले.

यावेळी अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी स्वयंरोजगार निर्माण होण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी तेरचे उपडाकपाल मनोज दबोले, तेरच्या सरपंच दीदी काळे, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, तेर सोसायटीचे माजी चेअरमन व्यंकटराव माळी, भास्कर माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजने संदर्भात सविस्तर माहिती प्रा. किरण औटी यांनी दिली. डाक विभागाच्या विविध योजना बाबत  सहाय्यक उपडाकपाल महेश वाघमोडे यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती सांगितली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरहरी बडवे यांनी केले.यावेळी गोरख माळी,प्रतिक नाईकवाडी, किशोर काळे, इर्शाद मुलांनी, अनिल ठोंबरे ,अन्वर कोरबू आदी उपस्थित होते.


 
Top