तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील जागजी येथील विजय सावतर यांना बसव प्रतिष्ठान मुरूम यांच्या वतीने संगित क्षेत्रातील कार्याबद्बदल बसवरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात सत्कार करण्यात आला. यावेळी हभप दिपक महाराज खरात, साहेबराव सौदागर, नवनाथ फंड, कल्याण कानडे आदी उपस्थित होते.