धाराशिव (प्रतिनिधी)-  सोलापूर ते तिरुपती दरम्यान धावणारी विशेष रेल्वे (गाडी क्र. 01437/01438) आता धर्मावरम पर्यंत वाढविण्यात आली असून, या सेवेला गुरुवार, दिनांक 24 जुलै 2025 पासून सुरुवात होणार आहे. 27 सप्टेंबर 2025 पर्यंत ही सेवा 10 फेऱ्यांसह चालणार आहे.

या गाडीचा विस्तार करण्यामागे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मा. ओमप्रकाश राजा निंबाळकर यांचे विशेष प्रयत्न आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार आणि भागातील वाढत्या गर्दीचा विचार करून त्यांनी रेल्वे प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करून ही विशेष सेवा मिळवली आहे.

गाडीचे प्रमुख थांबे सोलापूर, धाराशिव, लातूर, बीदर, रायचूर, तिरुपती, मदनपल्ले, कडिरी, धर्मावरम. या विशेष गाडीत स्लीपर, जनरल, एसी चेअरकार आणि एसी 3 टियर  डब्यांचा समावेश असून प्रवाशांसाठी आरामदायक प्रवास सुनिश्चित करण्यात आला आहे.

साप्ताहिक वेळापत्रक गुरुवारी सोलापूरहून प्रस्थान, शनिवार धर्मावरमहून प्रस्थान व सर्व स्थानकांवरील वेळापत्रक लवकरच अधिकृतपणे जाहीर करण्यात येईल. या सेवेमुळे धाराशिव, लातूर, बीदर, रायचूर आणि इतर भागातील यात्रेकरूंना तिरुपती व धर्मावरमकडे जाण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. 

 
Top