तुळजापूर (प्रतिनिधी)- हरित धाराशिव अभियान अंतर्गत अपसिंगा वन क्षेत्रामध्ये वन व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष अमीर शेख यांच्या हस्ते पूजन करून वृक्ष लागवडीस सुरुवात करण्यात आली. यावेळी वनरक्षक सुनिता तांदळे, वनरक्षक कल्याण सरडे, नरेंद्र आर्य विद्यालयाचे मुख्याध्यापक जयराज सूर्यवंशी, पिंपरकर सर यांच्यासह विद्यालयातील शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी व अपसिंगा व कामठा परिसरातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रगीत राज्य गीत आणि वृक्ष संवर्धनाबाबत संकल्प करण्यात आला कार्यक्रम उत्साहात पार पडला.