तुळजापूर (प्रतिनिधी)-   तालुक्यातील  नऊ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी जाहिर केली असल्याने जिल्हा परीषद, पंचायत समिती निवडणुक वातावरण ग्रामीण भागात निर्माण होण्यास आरंभ सुरु झाली आहे. रचनेवर 21 जुलै पर्यंत हरकती व सुचना सादर करता येणार आहेत. त्यावर जिल्हाधिकारी सुनावणी घेऊन 11 ऑगस्टला निर्णय घेऊन अंतीम प्रभाग रचना 18 ऑगस्ट पर्यंत राज्य निवडणुक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करतील. 

मागील निवडणुकीत जिल्हा परीषद 9 पैकी  5 जागा क़ाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस 4 तर पंचायत समितीच्या  18 जागेपैकी काँग्रेस 10 व राष्ट्रवादी काँग्रेस 7 व भाजप 1 असे पक्षीय बलाबल होते. त्यानंतर राजकारणातील पुलाखालुन बरेच पाणी वाहुन जावुन राज्यात सत्तासमीकरणे बदलल्याने त्याचा परिणाम निवडणुक वर होणार आहे. नवे राजकिय समीकरणे तयार होणार आहेत. सध्या तरी तालुक्यात महायुती विरुध्द महाविकास आघाडी अशी दुरुंगी लढत होण्याचे संकेत असले तर महायुती व महाविकास आघाडी मध्ये मोठा भाऊ कोण होणार यासाठी मोठी रस्सीखेच असणार आहे. महायुतीत भाजप मोठा भाऊ होवु शकतो. माञ महाविकास आघाडी सांगणे कठीन बनले आहे. मतदार संखेत वाढ होणार असुन आँगस्ट मधील मतदार नोंदणी पुरवणी मतदार यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे.

 
Top