नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथे गेल्या 52 वर्षांपासून सुरु असलेली भागवत सप्ताहाची परंपरा यावर्षीही संपन्न होणार आहे. नळदुर्ग येथील आदर्श सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव अहंकारी गुरुजी यांच्या निवासस्थानी दिनांक 4 जुलै ते 10 जुलै या दरम्यान भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
अहंकारी परिवाराकडून मागील 52 वर्षांपासून हा भागवत सप्ताह अखंडपणे सुरु आहे. या सात दिवसात वे.शा.सं.श्रीराम जोशी महाराज ( केज ) यांच्या अमृतवाणीने भागवत कथा सांगितली जाते. 4 जुलै पासून सुरु होणाऱ्या या सप्ताह मध्ये अनेक कार्यक्रम राबवले जातात. दिनांक 6 जुलैला आषाढी एकादशी, 8 जुलैला गोवर्धन काला, 9 जुलैला श्रीकृष्ण - सुदामा भेट सुदाम्याचे पोहे तर 10 जुलैला गुरुपौर्णिमाला समाप्ती असते.. यावेळी पाद्यपूजा केली जाते त्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाते. तरी या भागवत सप्ताहासाठी सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा व श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन बाबुराव - सौ.जयश्री बाबुराव अहंकारी, वसंतराव - सौ.वनमाला वसंतराव अहंकारी. बळवंत - सौ.माधुरी बळवंत अहंकारी,सौ.संध्या अनंत अहंकारी, सौ.अश्वीनी विकास अहंकारी, वर्षा वैभव अहंकारी, अदिती योगेश अहंकारी, सुनील पाटील यांच्यासह अहंकारी परिवाराकडून करण्यात आले आहे.