भूम (प्रतिनिधी)- अमृत 2 योजना लवकरात लवकर कार्यन्वीत करावी यासाठी जिल्हाधिकारी यांना पाणी कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमृत 2 ही योजना शहरवासीयांसाठी भविष्यकाळामध्ये पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. यासाठी पाणी कृती समितीच्या वतीने गुरुवार दिनांक 3 जुलै रोजी येथील गोलाई चौकामध्ये कोणत्याही प्रकारचा बंद  व रस्ता रोको न करता नागरिकांच्या उपस्थितीमध्ये भव्य अमृत 2 योजना बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती या निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. यामध्ये अमृत 2 योजनेला गती देण्यासाठी, भूम शहरात दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी ,हद्द वाढ भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी, शहरातील काही भागात कमी दाबाने येणारा पाणीपुरवठा या योजनेनंतर उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी या योजनेची गरज आहे. 

त्यासाठी पाणी कृती समितीचे अध्यक्ष दिलीप गाढवे व आयोजक माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही रॅली निघणार आहे.  ही रॅली सकाळी ठीक 11 वाजता मेहंतीशावली मैदान, वीर सावरकर चौक, महात्मा गांधी चौक, नागोबा चौक, ओंकार चौक मार्गे गोलाई चौक येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना याबाबत कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले .यावेळी दिलीप गाढवे, ॲड पंडित ढगे,रोहन जाधव,नारायण वरवडे,भागवत शिंदे,रंणजीत साळुंखे, डॉ .रामराव कोकाटे,अमोल भोसले, प्रभाकर हाके, पोपट जाधव, योगेश आसलकर ,तोफिक कुरेशी, संजय होळकर,अरुण देशमुख उपस्थित होते.

 
Top