धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 15 विद्यार्थ्यांची विविध कंपनी मध्ये कॅम्पस प्लेसमेंट मधून नुकतीच निवड झाली आहे . पुणे येथील नामंकित कंपनी जयहिंद मोटर्स, सेडमक आणि वेलमेड युरोपलॉकर्स पुणे स्थित या तीन कंपनीमध्ये महाविद्यालयाच्या मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकॉम्म्युनिकेशन विभागाच्या विदयार्थ्यांची निवड झाली. जयहिंद मोटर्स हि ऑटोमोबाईल क्षेत्रातील , सेडमक हि रोबोटिक्स आणि वेलमेड युरोपलॉकर्स हि लॉक डिझाईन क्षेत्रातील नामांकित कंपनी आहेत. जयहिंद मोटर्स मध्ये प्रज्ञा नारगळे ,शुभांगी आगाशे ,काझी सोहेल ,कृष्णा पांचाळ,विशाल सुतार ,अश्विनी अभंगे ,स्वीटी ओहोळ ,नंदकिशोर बट्टू ,महेश राठोड या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे तर तेजस घोडके याची सेडमक मध्ये निवड झाली आहे . वेलमड यूरोपलॉकर्स मध्ये काझी अश्फाक ,विशाल चव्हाण ,महेश राठोड ,ओंकार कुलकर्णी ,बालाजी कदम यांची निवड झाली आहे. जयहिंद या कंपनी ची मुलाखत प्रक्रिया कंपनी प्रतिनिधी संतोष कदम यांनी पहिली. सेडमक या कंपनीची मुलाखत प्रक्रिया कंपनी प्रतिनिधी श्री प्रकाश क्षीरसागर यांनी पहिली तसेच वेलमेड युरोपलॉकर्स या कंपनीची मुलाखत स्वप्नील जैन यांनी राबवली . या प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की “महाविद्यालयाकडे भरपूर कंपन्यांचा नोकर भरती साठी प्रस्ताव असून आम्ही जास्तीत जास्त कंपनी कडे विद्यार्थ्यांना रोजगार च्या संधी उपलब्ध करून देणार आहोत. मागील महिन्यात मुलांसाठी जॉब फेअर आयोजित करून तब्बल 35 कंपन्या महाविद्यालयात आणल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेचे व उत्साहाचे वातावरण आहे.“ या ड्राईव्ह चे आयोजन प्रा. अशोक जगताप ,प्रा . रणजित दंडनाईक ,प्रा. अनिरुद्ध देशपांडे, रामेश्वर मुंढे यांनी केले होतें. तेरणा ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह पाटील, संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, मल्हार पाटील, मेघ पाटील आणि व्यवस्थापकीय समन्वयक प्रा.गणेश भातलवंडे, व सर्व विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी यांनी निवड झालेल्या विद्यार्थींचे अभिनंदन केले आहे.