तुळजापूर (प्रतिनिधी) - पुजारी नगर फाऊंडेशन आणि तुळजापूर पत्रकार संघ संयुक्त विद्यमाने मंगळवार 8 जुलै रोजी श्रीनाथ लॉन्स येथे तुळजापूर श्री कृतज्ञता पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे आणि जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख यांच्या उपस्थितीत पत्रकार जगदीश कुलकर्णी,डॉ.सतीश महामुनी,गोविंद खुरुद यांना तुळजापूर श्री कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच जेष्ठ निवृत्त पत्रकार महिपतराव कदम, ऍड.किशोर कुलकर्णी, अंबादास पोफळे यांचाही याप्रसंगी विशेष गौरव करण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी असणार आहेत तर या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख मार्गदर्शन म्हणून ज्येष्ठ पत्रकार अनंत अडसूळ, जिल्हा पत्रकार संघाचे सचिव रवींद्र केसकर आणि यांची उपस्थित राहणार आहेत. प्रथमच होत असलेल्या तुळजापूर श्री कृतज्ञता पुरस्कार सोहळ्यासाठी तुळजापूर शहरातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते,नागरिकांसह तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे असे अवाहन तुळजापूर पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.