भूम (प्रतिनिधी)-रविंद्र हायस्कूल भूम येथील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना रविंद्र हायस्कूल भूम च्या 1997,98च्या बॅच कडून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपमुख्याध्यापिका पाटील शर्मिला, परिवेक्षक मिलिंद लगाडे सोबत माजी विद्यार्थी संदीप ढगे, अख्तर जहागिरदार, आश्रुबा निरफळ, मोहन मस्कर, भास्कर डोके, अनिल सुर्वे हे उपस्थित होते. तसेच काही याच बॅचचे विद्यार्थी व विद्यार्थिनी आपल्या व्यवसायानिमित्त बाहेर गावी आहेत. त्यांनी शालेय साहित्य शाळेच्या विद्यार्थ्यांना दिले. त्यामुळे शाळेच्या वतीने त्यांचे आभार परिवेक्षक लगाडे यांनी मानले. त्यांचा कार्यास शुभेच्छा दिल्या. पुढे आशीच शाळेतील विद्यार्थी साठी सहकार्य करावे असे सुचवले.

 
Top