धाराशिव (प्रतिनिधी)- शालेय विद्यार्थ्यांना मिळणार आवडत्या विषयाचे शिक्षक (चित्रकला शिक्षक) कलाविषय व कलाशिक्षकांच्या विद्यार्थी केंद्रित मागण्यांवर न्याय मिळण्याबाबत महामंडळाचे शिष्टमंडळ समवेत मा.ना.दादा भुसे मंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांची सकारात्मक चर्चा झाली. ना.दादा भुसे  यांनी सकारात्मक चर्चा करीत कला, क्रीडा आणि कार्यानुभव हे विषय विद्यार्थी व माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे असून नवीन पद निर्मिती प्रक्रिया सुरू करण्यात येईल, त्यानंतर लवकरच विद्यार्थ्यांना कला क्रीडा व कार्यानुभव या विषयाचे शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल असे असे सांगून महामंडळाच्या शिष्टमंडळाला उत्तम प्रतिसाद देत सकारात्मक चर्चा केली. तसेच महामंडळाच्या इतर चारही मुद्द्यावर चर्चा करून इतर प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून शिष्टमंडळाला आश्वासित केले.

कलाविषयक व कला शिक्षकांच्या प्रश्नासाठी निवेदन देताना राज्याध्यक्ष  नरेंद्र बारई,राज्य सरचिटणीस, दिगंबर बेंडाळे,राज्य सहसरचिटणीस,  प्रकाश पाटील नाशिक विभागाचे वि. उपाध्यक्ष सी.एच.पाटील, नागपूर विभागाचे विभागीय उपाध्यक्ष किशोर सोनटक्के, राज्य  प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र भोसले, जळगाव जिल्हा संघाचे सचिव किरण मगर, नाशिक जिल्हा संघाचे उपाध्यक्ष दिनेश निकम उपस्थित होते. शालेय शिक्षण मंत्री यांना या निवेदनाचा सकात्मक विचारासाठी धाराशिव जिल्हा कलाध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब बोराडे जिल्हा सचिव शेषनाथ वाघ सर्व जिल्हा पदाधिकारी कलाध्यापक बांधवानी अभिनंदन केले बऱ्याच वर्ष रखलेल्या कलशिक्षक भरती लवकरच व्हावी ही अपेक्षा व्यक्त केली.

 
Top