तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील नवोदय विद्यालयात दहावी बोर्ड विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल श्री हरी जाधव, श्री वैभव कुलकर्णी, श्री यश पाटील या शिक्षकांचा प्रमाणपत्र, देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.नवी दिल्ली (सीबीएसई)यांच्या मार्फत शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी वर्गाच्या बोर्ड परीक्षेमध्ये नवोदय विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला. परीक्षेसाठी 82 विद्यार्थी बसले होते .त्यामध्ये मराठी विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण 44 विद्यार्थ्यांनी प्राप्त केले . मराठी विषयाचे अध्यापन श्री हरी जाधव यांनी केले होते. गणित विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवणारे 1 विद्यार्थी, आर्ट इंटेलिजन्स मध्ये 100पैकी 100 गुण 1विद्यार्थी असे गुण प्राप्त केले .त्याबद्दल शनिवार दिनांक 12 जुलै 25 रोजी नवोदय विद्यालय समिती, पुणे .सहाय्यक आयुक्त श्री. आर प्रेमकुमार यांच्या हस्ते शिक्षकांचा गौरव करून शाब्बासकी देण्यात आली.
नवोदय विद्यालय सोलापूर, येथील प्राचार्य श्री एस सी कोठडी, नवोदय विद्यालय नांदेड, प्राचार्य श्री एस जी मंडले, विद्यालयाचे प्राचार्य श्री के वाय इंगळे ,उपप्राचार्य श्री डी .व्ही .बडे , शिक्षक वृंद ,विद्यार्थी ,शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. गौरव प्रसंगी सहाय्यक आयुक्त श्री प्रेम कुमार यांनी शिक्षकांना प्रोत्साहन देऊन धाराशिव जिल्ह्याचे नाव केवळ महाराष्ट्रातच न ठेवता देशभरामध्ये प्रथम क्रमांकावर यावे यासाठी प्रयत्न करा. कारण धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थी हुशार, होतकरू, प्रामाणिक असून हे नवोदय विद्यालय आयकॉन आहे. विद्यालयाच्या लौकीकासाठी तसेच विद्यार्थ्यांचे हितासाठी सतत प्रयत्न करा. मराठी विषयांमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक तुळजापूरचा आहे. पुढील वर्षी आणखी एका विषयामुळे धाराशिवचे नाव महाराष्ट्रात प्रथम येईल. अशा प्रकारचे प्रयत्न करा. असे यावेळी म्हणाले.