तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीक्षेञ तुळजापुर विकास आराखडा अंतर्गत श्रीतुळजाभवानी मंदिर परिसरात सध्या पाडकाम सुरू असताना या पाडकाम दरम्यान जुन्या नालीचे दगडी बांधकाम दिसुन आले आहे. हे काम पुर्णता दगडी असुन ते निजामकालीन असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
श्रीतुळजाभवानी मंदीरात मंदीर सध्या विकास कामे करण्यासाठी जेसीबीने पाडकाम केले असता राजमाता माँ जिजाऊ महाद्वार व मातंगी देवी मंदीर या मधील जागेत जुने भुयार सारखे दगडी बांधकाम दिसुन आले. या प्रकरणी मंदीर प्रशासनाने जुनी नालेकाम, ड्रेनेजसदृश असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.याची सध्या अधिकृत पाहणी सुरु असून, तपासणी अंती हे काय आहे हे स्पष्ट होणार आहे.
श्री तुळजाभवानी मंदीर परिसरात पाडकाम करताना पुरातन कामे निदर्शनास येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंदीर प्रशासन पाडकाम करताना काळजी घेत असल्याचे दिसुन येत आहे. श्री तुळजाभवानी मंदीर राजमाता माँ महाद्वार जवळ शहराचे पावसाचे पाणी वाहुन जाण्यासाठी दगडी नाला सदृश्य बांधकाम होते. त्यातुन श्री तुळजाभवानी मंदीर पासुन पन्नास फुट बाजुने हे पाणी मंदीर खालील आरादवाडी भागात जात असण्याची शक्यता असुन हे जुने काम आता निदर्शनास येत आहे.