तुळजापूर -(प्रतिनिधी)- प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी तुळजापूर येथील गीता परिवाराच्या वतीने सात जुलैपासून मोफत भगवद्गीता वर्गाला सुरुवात होत असून इच्छुक महिलांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन गीता परिवाराच्या प्रमुख सौ. अश्विनीताई कोंडो यांनी केले आहे.

गेल्या १३ वर्षापासून तुळजापुरात तालुक्यातील भगवद्गीता अभ्यास करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांना गीता परिवार यांच्याकडून मोफत भगवदगीता शिकवली जाते. यावर्षी ७ जुलैपासून या मोफत वर्गाला सुरुवात होत आहे.  सदर मोफत वर्ग हा चातुर्मासाच्या ४ महिने दररोज १ तास याप्रमाणे चालणार आहे. यामध्ये भगवद्गीता आणि विष्णुसहस्त्रनाम शिकविण्यात येणार आहे. मागील तेरा वर्षांमध्ये शेकडो महिलांनी भगवत गीतेचे ज्ञान प्राप्त केले असून गीता परिवाराच्या या उपक्रमामुळे समाजामध्ये भगवद्गीता शिक्षित झालेल्या महिलांची संख्या लक्षणीय दिसून येते आहे. यावर्षीही महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन गीता परिवाराच्या वतीने गीता परिवाराच्या प्रमुख सौ अश्विनीताई  अनंत कोंडो यांनी केले आहे.


 
Top