तुळजापूर -(प्रतिनिधी)- तुळजापूर येथे तालुका कृषी अधिकारी म्हणून पंधरा वर्ष सेवा करणारे श्री संजय जाधव यांची सेवानिवृत्त झाल्या निमित्त निरोप समारंभ सत्कार समारंभ घेवुन सेवापुर्ती सोहळा आयोजित करुन निरोप दिला
संजय जाधव १९९१ पासून आपल्या शासकीय सेवेस दापचेरी ता डहाणू जिल्हा ठाणे इथून उद्यानविद्या व फलोत्पादन विभागामध्ये सुरुवात केली सुरुवात केली त्यानंतर त्यांनी कृषी आयुक्तालय पुणे येथे संचालक कार्यामध्ये कृषी अधिकारी या पदावर कामकाज केले येथे उत्कृष्टिक कामगिरी बजावल्यानंतर ते तुळजापूर येथे कृषी अधिकारी या पदावर १९९८ ला रुजू झाले त्यांच्या संपूर्ण शासकीय सेवेतील जवळपास 15 वर्षाचा प्रदीर्घ कालावधी तुळजापूर येथे गेला.
त्यांमुळे गुरुवार दि ३ रोजी त्यांचा तुळजापूर येथे त्यांचा अधिकारी कर्मचारी व शेतकरी यांच्यामार्फत सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी त्यांना श्री तुळजा भवानी मातेची प्रतिमा भेट देण्यात आली.
तसेच नूतन तालुका कृषी अधिकारी तुळजापूर,श्री आबासाहेब देशमुख यांचे सहाय्यक कृषी अधिकारी अनिल पवार, ज्योती सुरवसे,नूतन गायकवाड,अर्चना माळी, उप कृषी अधिकारी आनंद पाटील,अनिल जगदाळे,गौतम कांबळे,राहुल मते रोहिदास संकपाळ,प्रणव होळकर,किशोर कुलकर्णी यांनी संपूर्ण कृषी कार्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी तुळजापूर तालुक्यातील कृषी विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रामानंद बर्डे यांनी केले प्रस्ताविक धन्यकुमार बिराजदार यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी श्री सत्यजित देशमुख यांनी केले.