धाराशिव (प्रतिनिधी)-  विठ्ठल नामाची शाळा भरली.. अशा विठ्ठलनामाच्या गजरात आषाढी एकादशीनिमित्त शहरातील तांबरी विभागातील श्री लिटल चॅम्प स्कूलमधील चिमुकल्यांनी भक्तीमय वातावरणात दिंडी काढली.  चिमुकल्यांच्या या दिंडीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. आषाढीच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांनी हरिनामाचा गजर करून परिसर दुमदुमून सोडला.

या दिंडीत बालवारकरी हातात भगव्या पताका, टाळ, मृदंग, वीणा घेऊन सहभागी झाले होते. चिमुकल्यांनी दिंडीत पांडुरंग-रुक्मिणी, संतांच्या वेशभुषा, पालखी, टाळ, मृदंग घेऊन पारंपारिक वेशभूषेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बाल वारकऱ्यांच्या या दिंडीचे नागरिकांनी कौतुक केले. दिंडीसाठी शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 
Top