भूम (प्रतिनिधी)-  भूम येथील आठवडी बाजारामध्ये मोटरसायकल दुचाकी चोरण्याचे प्रमाण वाढले असून दि. 17 जुलै रोजी पाच वाजण्याच्या दरम्यान आठवडी बाजारातील मांढरादेवी शॉपिंग सेंटर समोर तालुक्यातील नवलगाव येथील नागरिक सुरेश भगत यांची दुचाकी  चोरट्यांनी लंपास केली आहे. एम एच 25 झेड 3916 ही गाडी लंपास केली आहे. आठवडी बाजारामध्ये वारंवार दुचाकी व इतर चोऱ्याचे प्रमाण वाढले आहे. 

मागील काही काळात आठवडी बाजारामध्ये पोलीस प्रशासनाकडून पोलीस यंत्रणेची चार चाकी गाडी बाजारामध्ये उभी करून पोलीस कर्मचारी आठवडी बाजारात सतर्क राहत होते. अद्याप मात्र पोलीस प्रशासनाची गाडी किंवा पोलीस प्रशासनाचे कर्मचारी दिसून येत नसल्याने आठवडी बाजारामध्ये वारंवार चोऱ्याचे प्रमाण वाढले आहे. तरी पोलीस प्रशासनाने आठवडे बाजारामध्ये होणाऱ्या चोऱ्या थांबवाव्यात. अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

 
Top