भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील ईट परिसरातील दि. 16 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता चरण्यासाठी गेलेल्या तीन शेतकऱ्यांच्या 16 शेळ्या खड्ड्यामधील साठलेले दूषित पाणी पिल्यामुळे दगावल्या आहेत. शेतकऱ्यांचे दोन लाखाच्या पुढे नुकसान झाले आहे.

अधिक माहिती अशी की दिनांक 16 जुलै रोजी भूम तालुक्यातील शेतकरी ईट येथील तीन शेतकरी संगमेश्वर प्रकल्प शिवारात शेअर चरण्यासाठी घेऊन गेले असता दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास 16 शेळ्यांनी खड्ड्यामधील दूषित पाणी पिल्याने दगावल्या आहेत. यामध्ये बाबू शिंदे (माळी) 4, मदन शिंदे (माळी) 5, भाऊ शिंदे (माळी) 7 अशा एकूण 16 शेळ्या मरण पावल्या आहेत. इतर 70 शेळ्या दूषित पाणी न पिल्यामुळे यातून वाचल्या आहेत. एक तर वेळेवर पाऊस पडत नाहीये, त्यातच अशा प्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हताश होत आहे.

 
Top