तुळजापूर(प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील तांडा व वस्तीला  स्वतंत्र ग्रामपंचायत करूनच सरपंच पदाचे आरक्षण काढावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना बंजारा समाजाच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 पुढे निवेदन असे लिहिले आहे की धाराशिव जिल्ह्यात १५० ते २००‌ तांडे वस्ती हे १००० व या पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले तांडे आहेत.सध्या शासनाने परिपत्रक काढून नवीन तांडयाना महसुली दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करावे असे शासन निर्णय झाले आहे.परंतु यांची शासनाकडून म्हणावी‌ तेवढी प्रसिद्धी झाली नाही उद्या आरक्षण सोडत असल्यामुळे या तांडा वस्ती ना आरक्षणाचा फटका बसणार आहे.त्यामुळे जिल्ह्यातील नवीन ग्रामपंचायतचे  स्वतंत्र प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी मागवून घेऊनच सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात यावे अशी मागणी केली आहे.

या निवेदनावर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच शशीकांत राठोड, धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शेषराव चव्हाण,गोरक्ष सेनेचे जिल्हा सरचिटणीस कुमार राठोड, तालुका अध्यक्ष राजू चव्हाण, बंजारा संघाचे जिल्हाध्यक्ष हरिष जाधव, रामजी चव्हाण, सुनील चव्हाण, विनोद जाधव, तुकाराम चव्हाण, राजाराम चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top