तुळजापूर (प्रतिनिधी)- आषाढी ऐकादशी निमित्ताने शनिवार दि5रोजी विविध शाळा अंगणवाडी तील चिमुकल्यांनी श्रीविठ्ठल रुकमीणी वारकरी वेषभुषेत आल्याने आज शाळा अंगणवाड्या मध्ये विठ्ठल विठ्ठल विठला पांडुरंग विठलाच्या घोषात टाळमृंदग गजरात शाळांन मध्ये दिड्यां निघाल्या.
येथील नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 व देवकी अंगणवाडी क्रमांक 10 च्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुलांनी दिंडी काढले दिंडीचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष जयश्री कंदले, माजी नगरसेवक विजय आबा कंदले रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आनंद दादा कंदले यांच्या हस्ते करण्यात आला. या दिंडीत मुले वारकऱ्यांच्या वेशभूषित आले होते. तसेच विठ्ठल रुक्मिणीचे वेशभूषा परिधान केली होती.
शनिवार दप्तर विना शाळा या उपक्रमांतर्गत युवा शाहीर शंभू विजय जळके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडे सादर करून विद्यार्थ्यांना पोवाड्याचे प्रशिक्षण दिले. सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग गाडे यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक गणेश रोचकरी यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती याची जाणीव व्हावी, माहिती व्हावी यासाठी शाळेच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन केले जात असल्याची माहिती रोचकरी यांनी दिले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य महेंद्र पाटील,स.शि. महेंद्र कावरे, सुरजमल शेटे, सुज्ञानी गिराम, केरण लोहारे,विद्यादेवी स्वामी अंगणवाडीच्या सेविका किरण गरडकर, मदतनीस श्रीदेवी पाचंगे, पालक विद्यार्थी उपस्थित होते.