धाराशिव (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील कवठा शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मंगळवार दिनांक आठ जुलै रोजी सायंकाळी 6.20 वाजता छापा टाकून तब्बल 17 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी घटना स्थळावरून जुगार खेळणाऱ्या 12 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, उमरगा येथील उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने गुप्त माहिती मिळाल्यामुळे दिनांक 8 जुलै रोजी विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या नेतृत्वाखाली उमरगा तालुक्यातील कवठा येथील शिवारातील दयानंद सोनवणे यांच्या शेतातील गोठ्यावर छापा टाकला.

यावेळी त्या ठिकाणी तिरट जुगार खेळणाऱ्या 12 लोकांवर कारवाई केली. यावेळी शाम निशीकांत काळे, समीर सर्फराज शेख, आकाश राम कदम, महेश मोहन काळे, किशोर बालाजी ननुरे, कैलास शेषेराव पुजारी, गोपाळ पंड पंजारी, हबीब दस्तगीर सय्यद, दत्ता पुन्नु चव्हाण, जितेंद्र ज्ञानोबा काळे, विवेकानंद शंकरराव सोनवणे, सचिन हरिदास गायकवाड हे जुगार खेळत असताना पथकास मिळुन आले. पथकाने नमूद

जुगार अड्ड्यावरुन जुगार साहित्यासह 3 कार, 9 मोबाईल फोन व रोख रक्कम 13,900 असा एकुण 17,58,690 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. त्या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 4, 5 अंतर्गत उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या आदेशावरुन उमरगा उप विभागाचे सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उमरगा यांच्या पथकाने केली.

 
Top