तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर-धाराशिव रस्त्यावरील नव्या बसस्थानकाजवळील एस एस मोबाईल शाँपीमध्ये सोमवारी राञी अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करुन सुमारे तेरा लाखाचे मोबाईल लंपास केल्याची घटना घडली.
सोमवार राञी चोरट्यांनी पाठीमागील बाजुने मोबाईल शाँपीत प्रवेश करुन दुकानातील किंमती आयफोन व लाखो रुपयांचे मोबाईल पळवले. प्राथमिक तपासात 2-3 चोरट्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सकाळी चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी आले आहे, फिंगरप्रिंट्स घेतले आहेत, आणि सीसीटीव्ही फुटेज पोलीस ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. एसएस मोबाईल शाँपीत यापूर्वीही चोरीची घटना घडली असून त्या वेळेस बहुतांश मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले होते. यंदा मात्र चोरटे अधिक हुशारीने, आणि कोणतीही साधन-शस्त्र न वाजवता, गुपचूप चोरी करून गेले.