तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) चे उपाध्यक्ष तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आज श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करत आढावा घेतला.
श्री तुळजाभवानी मंदिर हे राज्य संरक्षित प्राचीन व ऐतिहासिक स्मारक असून दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मंदिराच्या जतन, संवर्धन आणि विकासासाठी विविध योजनांअंतर्गत कामे सध्या सुरू आहेत. याच कामांचा दर्जा, प्रगती आणि अंमलबजावणी प्रक्रियेचा तपशीलवार आढावा आमदार पाटील यांनी घेतला. आमदार पाटील यांनी यावेळी संबंधित कामासंदर्भात काही सूचना केल्या. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे, तसेच मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.