भूम  (प्रतिनिधी)- अखेर भूम आगाराला उल्हास शिनगारे यांची आगारप्रमुख म्हणून आज पदभार स्वीकारला आहे . ता . 19 रोजी पाच नवीन एसटी बस झाल्या आगारात दाखल .मागील पाच महिन्यापासून भूम एस टी आगाराचा चाललेला रामभरोसे कारभार, आगाराबाबतचे व कायमस्वरूपी आगारप्रमुख नसल्याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन दि. 20 जून पासून कायमस्वरूपी शिनगारे .आगारप्रमुख यांची नेमणूक केली आहे.

कायमस्वरूपी आगार प्रमुख नसल्यामुळे भूम आगाराची दुर्दशा झाली आहे. नादुरुस्त बसेस ,दररोज फेऱ्या रद्द होणे, फेरीला जाणाऱ्या बसेस  बंद पडणे त्यामुळे आगारातील नियोजन पूर्णपणे कोलमोडले होते. राज्य परिवहन महामंडळाकडून भूम आगाराला नवीन येणाऱ्या 10 बसेस पैकी 5 बसेस ता 19 रोजी मिळाल्या आहेत. परंतु राहिलेल्या बसेस आल्यानंतरच लांब पल्ल्याच्या जाणाऱ्या गाड्यांचे नियोजन सुरळीतपणे होऊ शकणार आहे. सध्या आगर प्रमुखांनी आगाराचे विस्कटलेली नियोजन व्यवस्था सुरळीत करून वेळेवर एसटी बसेस सोडून प्रवाशांना एसटी बस ची स्थानकामध्ये वाट बघत बसावी लागत आहे. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. भूम बस स्थानकामध्ये स्थानकप्रमुख कायमस्वरूपी ठेवावा त्यामुळे स्थानकामध्ये प्रवाशांना चौकशीसाठी कोणत्याही प्रकारची अडचण राहणार नाही. नवीन आलेल्या आगार प्रमुखांनी आगाराचे नियोजन करून प्रवाशांना वेळेवर बसेस उपलब्ध करून सुखकर प्रवास होण्यासाठी नियोजन करावे असे मागणी प्रवासी वर्गामधून होत आहे.

 
Top