तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील  काटी सावरगाव येथील कु.नेहा नेताजी मगर या शेतकरी कन्येने  जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकून तिने नेट परीक्षा मध्ये 720 पैकी 635 मार्क घेवुन यश संपादन केल्याबद्दल तिने मराठा समाजाची व घराण्याची मान उंचावल्या बद्दल क्रांती ठोक मोर्चा व जनहित संघटनेने    तिचा मातापित्यासह सत्कार केला.

काटी सावरगाव येथील तिचा घरी जावुन  तिचा फेठा बांधुन हार घालुन बुके देवुन, पेढे भरुवुन  आई-वडिलांचा सत्कार करुन अभिनंदन केले व पुढील शिक्षणास शुभेछा दिला. यावेळी अजय  साळुंखे, प्रशांत कदम, महेश गवळी, तेजस बोबडे, सत्यजित साठे, हणमंतराव फंड, सुनिल शिंदे, जोतीराम ताटे, गोकुळ शिंदे, गणेश फंड, भैय्या फंड, तुकाराम गवळी, विशाल माने, हनुमंत ताटे, संजय मुळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top