धाराशिव (प्रतिनिधी)- अन्न ,वस्त्र, निवारा या गरजेइतकेच दैनंदिन जीवनात योगा गरजेचा असून आपण वेळीच आपली गरज ओळखली तर संभाव्य होणाऱ्या धोक्यापासून स्वतःला वाचवू शकतो. असे प्रतिपादन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे योगशिक्षक हनुमंत भालेकर यांनी केले .येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. हनुमंत भालेकर हे गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ योग प्रशिक्षण देत असून त्यांनी बऱ्याच लोकांना प्रशिक्षित केले आहे.

यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की, सद्या अनेक आरोग्याच्या समस्या भेडसावत असून शुगर, बीपी,कोलेस्ट्रॉल यासारख्या समस्या प्रत्येक घरात आपल्याला दिसतात. त्यामुळेच फक्त एक दिवस योग दिनानिमित्त योगा करून चालत नाही तर आपण आपल्या आरोग्या प्रती सजग राहून दैनंदिन योगाभ्यास केला पाहिजे. तसेच सध्याच्या शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाचा भाग म्हणून देखील योगाशिक्षण विद्यार्थ्यांना अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी व स्टाफ यांनी सुद्धा दैनंदिन योगा केला पाहिजे. या शिबिरासाठी सर्व विभाग प्रमुख ,प्राध्यापक, आणि विद्यार्थी मिळून 300 पेक्षा जास्त उपस्थित होते. कार्यक्रम समन्वयक म्हणून डॉ. डॉ.राजश्री यादव यांनी काम पाहिले. योग प्रशिक्षणानंतर प्रत्येकांना अल्पोपहार देण्यात आला. यावेळी हनुमंत भालेकर यांचा महाविद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

 
Top