तुळजापूर (प्रतिनिधी)- हिंदी भाषा सक्ती बाबतीत सरकारच्या छुप्या हेतुन मदत करीत असाल तर तो आम्ही महाराष्ट्र द्रोह समजु असा इशारा मनसे ने तालुक्यातील विविध शाळांचा मुख्याध्यापक यांना पञ देवुन दिला.
मुख्याध्यापक यांना दिलेल्या पञात म्हटले आहे कि, एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाचा नुसता गोंधळ सुरु आहे. आधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा करायची असा निर्णय आला. ज्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध केला, पुढे त्यावर जनमत तयार झालं. पुढे जनमताचा रेटा बघून सरकारने हळूच पळवाट काढली आणि सांगितलं की हिंदीची सक्ती नसेल पण कोणाला हिंदी शिकायची असेल तर तो अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाईल. सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करणार असाल तर हा आम्ही 'महाराष्ट्र द्रोहच' समजू हे नक्की....महाराष्ट्रात या भाषा लादण्याच्या प्रकरणाबाबत प्रचंड असंतोष आहे हे आपण ध्यानात ठेवावे.
बाकी आपण सुज्ञ आहातच ! अधिक काय लिहीणे ! उद्या ती मुले मोठी झाल्यावर त्यांच्या गरजेनुसार त्यांना हवी ती भाषा ते शिकू शकतात. पण आत्ता पासूनच हे ओझे त्यांच्यावर कशाला ? तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलेत तर आम्ही तुमच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहू. पण तुम्ही स्वेच्छेने सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करून, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर भाषेचं ओझं लादणार असाल आणि अशी भाषा लादणार असाल, जी शिकली काय नाही शिकली काय, फरक पडत नाही, तर मात्र माझे महाराष्ट्र सैनिक तुमच्याकडे (चर्चेला) येतील.
या विषयांत जसा आम्ही तुमच्याशी संवाद साधतोय तसंच एक पत्र आम्ही सरकारला पण पाठवलं आहे. हिंदी भाषेच्या किंवा एकूणच तिसऱ्या भाषा शिकवली जाणार नाही याचा लेखी आदेश हवा असं आम्ही सरकारला ठासून सांगितलं आता तो आदेश काढतील किंवा न काढतील, पण तुम्ही या बाबतीत सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करणार असाल तर हा 'महाराष्ट्र द्रोहच' समजू हे नक्की....
महाराष्ट्रात या भाषा लादण्याच्या प्रकरणाबाबत प्रचंड असंतोष आहे हे आपण ध्यानात ठेवावे !
बाकी आपण सुज्ञ आहातच ! अधिक काय लिहीणे ! असे पञात नमुद केले असुन हे पञ जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव,जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार,विधानसभा अध्यक्ष मयूर गाढवे,तालुका सरचिटणीस गणेश पाटील, धर्मराज सावंत,अविनाश पवार, विशाल माने,नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी मनविसे तालुकाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दिले,
मनसे नेते नांदगावकरांनी घेतले देवीदर्शन !
मनसे नेते माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांनी शुक्रवार दि. 20 जून रोजी श्रीतुळजाभवानी दर्शन मातेचे दर्शन घेतले. यावेळी मनसे नेते दिलीप धोञे सह मनसे पदाधिकारी उपस्थितीत होते.