धाराशिव (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सकाळी 7 वाजता श्री. तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा प्रशासनाच्या व विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने भव्य योग सत्राचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, उपसंचालक गणपतराव मोरे,जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे आदीच्या यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून करण्यात आले.पतंजली योग संस्थेचे राम ढेरे यांनी मार्गदर्शन करत प्रात्यक्षिके घेतली.यावेळी योगविषयी माहिती अनुरत नागटिळक यांनी दिली.
कार्यक्रमात खो-खो वर्ल्ड कप विजेती अश्विनी शिंदे,शिवछत्रपती पुरस्कार विजेती गौरी शिंदे,आर्ट ऑफ लिव्हिंगचे विकास गाडेकर,क्रीडा भारतीच्या अलका पवार, स्काऊट गाईडचे विक्रांत देशपांडे,तालुका क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी व अक्षय बिरादार, मार्गदर्शक डिंपल ठाकरे, विश्वास खंदारे, भारत केंद्राचे वैभव लांडगे,साधनाताई,वैशाली उपासे यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी व 500 हून अधिक योगप्रेमी, विद्यार्थी,युवक, युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शुभांगी रोकडे यांनी केले.
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी उपस्थितांना दररोज योगासने करण्याचे आवाहन करत सांगितले की, “योग केल्यामुळे आपण औषधांपासून मुक्त राहू शकतो व ‘ वन अर्थ,वन हेल्थ ' ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवू शकतो.” कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांचे आभार जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी मानले.
श्री साई जनविकास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्री साई जनविकास औद्योगिक प्रशिक्षण संस्था छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव येथे डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्याच्या दृष्टीने योग साधनेचे अनन्य साधारण महत्व असून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत योग साधनेची गोडी वृद्धिंगत व्हायला हवी त्या अनुषंगाने आयटीआय मध्ये योग साधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व प्रशिक्षणार्थी व निदेशक यांनी सहभाग घेतला.
विद्यापीठ उपपरिसरात आंतरराष्ट्रीय योग दिन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. “ एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग“ हि या वर्षीची थीम आहे. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांच्या हस्ते समारंभाचा शुभारंभ करण्यात आला. अशोक लोंढे यांनी प्रात्यक्षिकसह मानवी जीवनातील योगाचे महत्व स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राहुल खोब्रागडे, डॉ. जितेंद्र शिंदे, कमवा व शिका योजना समन्वयक प्रा. डॉ. गोविंद कोकणे, कक्ष अधिकारी विद्याधर गुरव, डॉ. गणेश शिंदे, वरिष्ठ सहाय्यक चंद्रकांत आनंदगावकर, ग्रंथालय सहाय्यक मल्लिनाथ लामजणे, इ. उपस्थित होते.